परदेशी शिक्षणाची दारे होणार 'खुली'

परदेशी शिक्षणाची दारे होणार 'खुली'

औरंगाबाद : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती राखीव प्रवर्गासाठी मर्यादित होती. मात्र, आता खुल्या प्रवर्गातील 20 विद्यार्थ्यांना राज्य शासन शिष्यवृत्ती देणार आहे. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासूनच लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 ऑक्‍टोबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना यावर्षीपासून सुरु झाली आहे. परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतील. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या संस्था तसेच विद्यापीठाचे मानांकन "टाईम्स हायर एज्युकेशन' आणि "क्वॅक्‍युरेली सायमंडस्‌' यांची रॅंकिंग 200 च्या आत असेल तरच ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

तरच मिळणार शिष्यवृत्ती 

- विद्यार्थ्यांच्या कुटुंबासह उत्पन्न 20 लाखांपेक्षा कमी. 

- भारतातील पदवीत 60 टक्‍केपेक्षा अधिक गुण अनिवार्य.

- पदव्युत्तरसाठी 35, तर पीएच. डी.साठी 40 वयोमर्यादा. 

- एकूण जागांतून मुलींसाठी 30 टक्‍के जागा राखीव. 

अशी मिळणार मदत

पदव्युत्तरसाठी दोन आणि पीएच. डी. साठी चार वर्षाचा कालावधी ठरवण्यात आला आहे. योजनेअंतर्गत विद्यापीठ/संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, परदेशात जाण्या-येण्याचा विमान प्रवासाचा खर्च देण्यात येणार आहे. 

शिष्यवृत्तीसाठी वर्गवारी 

पदव्युत्तर पदवी/पदविका आणि पीएच. डी. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, औषधनिर्माणशास्त्र शाखेला प्रत्येकी एक-एक तर, अभियांत्रिकी/वास्तुकलाशास्त्र शाखेसाठी प्रत्येकी चार, याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील 20 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

असा करा अर्ज...

www.dtemaharashtra.gov.in/Foreignscholarship2018 या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया करावी लागेल. त्या अर्जाची प्रत, आवश्‍यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांच्या स्वसाक्षांकित प्रतिसह मुळ कागदपत्रे यांच्या पडताळणीसाठी जवळच्या सहसंचालक कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाईन अर्जासाठी 30 ऑक्‍टोबर तर पडताळणीसाठी 19 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com