जात प्रमाणपत्राविना मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश; पालकांचे हमीपत्र बंधनकारक

तात्या लांडगे
रविवार, 14 जुलै 2019

शासनाच्या नव्या आदेशानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड यांनी दिली.

सोलापूर : आयटीआयच्या प्रवेशाच्या पहिल्या प्रवेशफेरीस नुकतीच सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणानुसार पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी एसईबीसीचे जात प्रमाणपत्र घेतले जात होते. मात्र, अनेक मुलांकडे ते प्रमाणपत्र नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत पालकांनी चिंता व्यक्‍त केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जात प्रमाणपत्र नसले, तरीही प्रवेश द्यावा, असे निर्देश सरकारने आयटीआयच्या प्राचार्यांना दिले आहेत. मात्र, एक महिन्यात जात प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखल द्यावा लागणार आहे. मात्र, पालकांनी तसे हमीपत्र देणे बंधनकारक असेल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न तात्पुरता मार्गी लागला आहे.

शासनाच्या नव्या आदेशानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students will get admission without the caste certificate