मुलांनो अभ्यास करा, पाचवी अन्‌ आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; १५ डिसेंबरपर्यंत करा अर्ज; आता ५ ते ७५०० रुपये शिष्यवृत्ती

चालू शैक्षणिक वर्षासाठी १८ फेब्रुवारीला एकाचवेळी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
10th, 12th
10th, 12thexam

सोलापूर : चालू शैक्षणिक वर्षासाठी १८ फेब्रुवारीला एकाचवेळी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ३४ हजार ४३२ शाळांमधील इयत्ता पाचवीच्या तीन लाख ७७ हजार ८०६ आणि आठवीच्या दोन लाख ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

राज्यात १९५४-५५ पासून शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित असून इयत्ता चौथी व सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती. २०१५च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा पाचवी व आठवीसाठी घेतली जाते. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती’ ही शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक दिली जाते.

इयत्ता पाचवीसाठी एकूण संच संख्या १६ हजार ६८३ एवढी असून इयत्ता आठवीसाठी १६ हजार २५८ संच संख्या आहे. दरवर्षी पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे सहावी, सातवी व आठवीत शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० हजार ४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तर आठवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ३२ हजार ५१६ विद्यार्थ्यांनाही वार्षिक शिष्यवृत्ती मिळते.

बॅंक खात्याची अचूक माहिती द्यावी

२०२१पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त नसलेल्या शिष्यवृत्ती धारकांनी आपल्या बँक खात्याची माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बॅंक खात्याची अचूक द्यावी. www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अपडेट झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा होईल. तर २०२१ नंतर शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित शाळेने परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर शाळा लॉगीनद्वारे अचूक भरावी. शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे संपर्क साधावा, असे उपसंचालक (योजना) राजेश क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.

पाच ते साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती

२२ जुलै २०१०च्या शासन निर्णयाप्रमाणे २०२२-२३पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या विविध दराने वार्षिक (इयत्ता पाचवीसाठी कमाल एक हजार व इयत्ता आठवीसाठी कमाल दीड हजार रुपये) शिष्यवृत्तीचे वितरण व्हायचे. चालू वर्षापासून सरसकट इयत्ता पाचवीसाठी पाच हजार रुपये तर आठवीसाठी साडेसात हजार रुपये, अशी शिष्यवृत्ती वाढविली आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वितरित झाली असून त्यासाठी परीक्षा परिषदेतील मंगल वाव्हळ, अश्विनी साठे यांनी परिश्रम घेतले. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच त्यांनाही शिष्यवृत्ती मिळेल, असे या विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com