'गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करा'

uddhav_thackeray
uddhav_thackeray

मुंबई - ‘‘पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा एक पाऊल पुढे असले पाहिजे. गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्यांच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे,’’ असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिला.

दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी आणखी कठोर तयारी करावी, असेही ते या वेळी म्हणाले. पोलिस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करत होते. 

महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारे शूरवीर असा पोलिस दलाचा गौरव करून ठाकरे म्हणाले, की कोणतीही नवीन योजना प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या भरवशावर आणली जाते. योजनेच्या अंमलबजावणीत कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिस दलाचे महत्त्वपूर्ण योगदान असते.

पोलिसांसाठी ‘शिवनेरी’चा प्रवास
वॉरंट बजावण्यासाठी जाताना तसेच गुन्हेगारांना ताब्यात घेऊन येताना पोलिसांना एसटीच्या साध्या बसचा प्रवास लागू आहे. मात्र, वेगवान हालचालींची आवश्‍यकता लक्षात घेता ‘शिवनेरी’ आणि आरामगाड्यांच्या प्रवासास परवानगी देण्याचा विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पोलिस गृहप्रकल्पांसाठी सरकार आवश्‍यक तरतूद करेल. मात्र, केंद्राकडून अधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले...  
    ड्रोनहल्ल्याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज 
    पोलिस खात्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा विचार व्हावा
    राज्य पोलिस दल उत्कृष्ट काम करीत असल्यामुळे राज्यात चांगली गुंतवणूक 
    नक्षलवादाचा सामना करण्यासाठी छत्तीसगड, तेलंगणसोबत समन्वयाने काम व्हावे
    अवैध सावकारीविरोधातही कारवाई करण्यात यावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com