esakal | ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 
sakal

बोलून बातमी शोधा

Subcommittee will form for solving problems of OBC community

या बैठकीत ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर ः राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे राज्यभर आमदार, खासदार यांच्या घरासमोर करण्यात आलेल्या थाळीनाद आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांनी मुंबई येथे शुक्रवार (दि.9) ला ओबीसी शिष्टमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा - कोरोनाच जबाबदार! केस कापण्याच्या किंमतीत झाली तब्बल दुप्पट वाढ; दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर

बैठकीत इतर मागास बहुजण कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, यांच्यासह मुख्य सचिव  सिताराम कुंटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, कोंकण विभागाचे चंद्रकांत  बावकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, तांडेल, कमलाकर दराडे, बबलू कटरे, प्रकाश देवतळे  व ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. व्हीडीओ कॉन्फरंसींगद्वारे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील सहभागी झाले होते.

यावेळी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिली. ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणी प्रश्नांची आपल्याला जाणीव असुन त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करुन ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

 या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पध्दतीने निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चीत करावीत, असे मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. यावेळी इतर मागास-बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने सदर बैठक तात्काळ लागली, सभेत पुर्ण सहभाग घेवुन ओबीसी समाजासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ