'संभाजीनगर नावासाठी आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही'

बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी याबाबत विचारले असता ते म्हणाले, संभाजीनगर नावाशी आमची बांधिलकी आहे
subhash desai.
subhash desai.subhash desai
Summary

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापुर्वीच या शहराला संभाजनीगर नाव दिलेले आहे.

औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला संभाजीनगर नाव दिलेलेच आहे. यामुळे हे नाव वापरण्यासाठी आणखी कुणाच्या परवानगीची गरज नाही असे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. पालकमंत्री सुभाष देसाई शुक्रवार (ता. तीन) औरंगाबाद येथे आले होते. उद्योगमंत्री श्री. देसाई यांच्या लेटरपॅडवर गुरूवारी (ता.दोन) आलेल्या दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनात दहा वेळा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. या पार्श्‍वभुमीवर शुक्रवारी जिल्हा व शहरातील विकास प्रकल्पासंबंधी नऊ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणाऱ्या सादरीकरणाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी याबाबत विचारले असता पालकमंत्री देसाई म्हणाले, संभाजीनगर नावाशी आमची बांधिलकी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापुर्वीच या शहराला संभाजनीगर नाव दिलेले आहे यामुळे हे नाव वापरण्यासाठी आम्हाला आणखी कोणाच्या परवानगीची गरज नाही. जनता हेच नाव वापर आहे. कागदोपत्री आणि सरकार दरबारी जी प्रक्रिया होणे आवश्‍यक आहे ती होत राहील मात्र आता लोकांनीच हे नाव वापरायला सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बंद असलेली मंदिरे खुली करावीत यासाठी विरोधी पक्षाकडून मागणी लावून धरली जात असल्याबद्दल विचारले असता याबाबत अजून निर्णय झाला नसल्याचे पालकमंत्र्यांनी सांगून अधिक बोलणे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com