यंदाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

राज्यातील मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी खुंटलेली उसाची वाढ अन्‌ चारा छावण्यांसाठी वापरलेला ऊस; तर या वर्षीच्या सांगली, सोलापूर, कोल्हापुरातील पुरामुळे तब्बल अडीच लाख हेक्‍टरवरील उसाचे नुकसान झाले. यामुळे यंदाचा हंगाम ऑक्‍टोबरऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, मंत्री समितीकडून औपचारिक घोषणा बाकी असल्याचे साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी सांगितले.

सोलापूर - राज्यातील मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी खुंटलेली उसाची वाढ अन्‌ चारा छावण्यांसाठी वापरलेला ऊस; तर या वर्षीच्या सांगली, सोलापूर, कोल्हापुरातील पुरामुळे तब्बल अडीच लाख हेक्‍टरवरील उसाचे नुकसान झाले. यामुळे यंदाचा हंगाम ऑक्‍टोबरऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, मंत्री समितीकडून औपचारिक घोषणा बाकी असल्याचे साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात मागील साखर हंगामात १९८ कारखान्यांनी सुमारे १२ लाख हेक्‍टरवरील उसाचे गाळप घेतले. यंदा दुष्काळ व पुराचा सर्वाधिक फटका उसाला बसला. या वर्षी गाळपासाठी १६४ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले असून, त्यांना अद्याप परवाना मिळालेला नाही. दरम्यान, सीमावर्ती भागातील कारखान्यांनी अन्य राज्यांतील ऊस गाळपासाठी आणण्याची चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. तर, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीची बैठक झालेली नाही. राज्यातील काही कारखान्यांनी गाळप हंगाम लांबणीवर टाकावा, अशी मागणीही साखर आयुक्‍तांकडे केली होती. त्यामुळे हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू केला जाईल, असे आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar Factory Galap Season after 15th november