साखरेला जागतिक बाजारात ‘गोडवा’

रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्याने आणि ब्राझीलच्या आगामी हंगामात ऊसगाळप घटण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली.
Sugar
Sugaresakal
Summary

रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्याने आणि ब्राझीलच्या आगामी हंगामात ऊसगाळप घटण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) - रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्याने आणि ब्राझीलच्या (Brazil) आगामी हंगामात ऊसगाळप (Sugarcane) घटण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) साखरेच्या दरात (Sugar Rate) वाढ झाली. गेल्या तेरा दिवसांत पांढऱ्या साखरेचे दर प्रतिक्विंटल ३७४१ रुपयांवरून ४०११ रुपयांवर, तर कच्च्या साखरेचे दर २९९४ रुपयांहून ३२३४ रुपयांवर पोहोचले आहेत. यामुळे साखरेच्या निर्यातीला पुन्हा चालना मिळाली असून साखर उद्योगास बळकटी मिळणार आहे.

चालू साखर हंगामात केंद्र सरकारने कुठल्याही अनुदानाशिवाय साखर निर्यातीस परवानगी दिली. गेल्या ऑगस्टमध्ये प्रतिटन ४०० डॉलरवर असलेले पांढऱ्या साखरेचे दर ऑक्टोबरच्या नव्या हंगामात वाढू लागले. ते नोव्हेंबरमध्ये ५०० डॉलरवर पोचले. त्यामुळे डिसेंबरपर्यंत निर्यातीस वेग आला होता. परंतु, डिसेंबरअखेर ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत गेल्यावर जानेवारी, फेब्रुवारीत आंतरराष्ट्रीय बाजार खाली आले. कोरोना ओसरल्यानंतर फेब्रुवारीअखेरपर्यंत पांढऱ्या साखरेचे दर ४८७ डॉलर, तर कच्च्या साखरेचे दर ३९० डॉलर प्रतिटनापर्यंत पोहोचले.

देशांतर्गत ३१०० रुपये प्रतिक्विंटल दरापेक्षाही कमी दरात निर्यात करावी लागत होती. कच्च्या साखरेला तर २८०० रुपये प्रतिक्विंटलने निर्यातीसाठी मागणी होती. त्यामुळे साखरेच्या निर्यातीचा वेग मंदावला होता. कारखाने दरवाढीच्या प्रतीक्षेत होते आणि गेल्या एक मार्चपासून दरवाढीस सुरुवात झाली. १० मार्चला पांढऱ्या साखरेचे दर ४०११रु. प्रतिक्विंटल, तर कच्च्या साखरेचे दर ३७४१ रु. प्रतिक्विंटल झाले. त्यामुळे कच्च्या साखरेला निर्यातीचे खर्च वजा जाता ३१५० ते ३२०० रुपये, तर पांढऱ्या साखरेला त्यापेक्षा जादा दर मिळणार आहे.

कच्च्या साखरेच्या निर्मितीस प्रतिक्विंटल शंभर रुपयांची बचत होते. शिवाय साखर उताराही वाढतो. त्यामुळे कारखाने कच्च्या साखरनिर्मितीवर भर देत आहेत. मागील आठवड्यात कच्च्या साखरेच्या निर्यातीस छत्रपती कारखान्यास ३१२५ रुपये प्रतिक्विंटल, तर सोमेश्वर कारखान्यास ३१५९ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

दर का वाढले?

चालू आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ७२ रुपयांवरून थेट ७६.७६ रुपयांवर अवमूल्यन झाल्यानेही निर्यातीत फायदा होणार आहे. भारताच्या साखर उत्पादन वाढीने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची तूट कमी झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाने कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इथेनॉल व साखरेवरही परिणाम होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com