esakal | कारखान्यांना दिलासा ! साखरेच्या दरात समाधानकारक वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

कारखान्यांना दिलासा ! साखरेच्या दरात समाधानकारक वाढ

ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांतील सणवार व सर्वत्र शिथिल केलेली टाळेबंदी या सर्वांचा परिपाक होऊन या दोन्ही महिन्यातील साखरेच्या कारखाना स्तरावरील दरात वाढ झालेली आहे.

कारखान्यांना दिलासा ! साखरेच्या दरात समाधानकारक वाढ

sakal_logo
By
प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांतील सणवार व सर्वत्र शिथिल केलेली टाळेबंदी (Lockdown) या सर्वांचा परिपाक होऊन या दोन्ही महिन्यातील साखरेच्या कारखाना (Sugar Mill) स्तरावरील दरात वाढ झालेली आहे. यामुळे अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला (Sugar industry) काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्याचा स्थानिक बाजारातील विक्रीसाठी दिलेला 21 लाख टनाचा कोटा व त्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी केंद्र शासनाकडून (Central Government) 22 लाख टनाचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या (National Cooperative Sugar Federation) स्तरावरून केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाशी (Ministry of Food) असणारा सततचा संपर्क व गेल्या पाच वर्षातील ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रत्यक्ष साखर विक्रीची आकडेवारी वेळोवेळी देण्यात आल्याने अन्न मंत्रालयाकडून हे महिनानिहाय विक्री कोटे जाहीर झाले आहेत.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेपूर्वी सुरक्षिततेसाठी लसीकरणाचा पर्याय! वेग वाढला

जागतिक स्तरावर ऊस, साखर, इथेनॉल उत्पादनात तसेच निर्यातीत अग्रभागी असणाऱ्या ब्राझीलमध्ये गेल्या 90 वर्षातील सर्वात भीषण दुष्काळ व त्यानंतर शेतातील उभा ऊस गोठणे यामुळे ब्राझीलचे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या 385 लाख टनावरून थेट 325 लाख टनापर्यंत घसरण्याचे अनुमान आहे. त्यासोबत जगातील द्वितीय क्रमांकाचा साखर निर्यातदार असणाऱ्या थायलंडमधील साखर उत्पादन देखील कमी राहणार असल्याने आंतरराष्ट्रीय साखर दरात आलेली तेजी टिकून आहे. त्यामुळे भारतीय साखरेसाठी चीन, इंडोनेशिया, बांग्लादेश, दुबई, शारजा, श्रीलंका, कोरिया, मलेशिया, इराक, सोमालिया, सौदी अरेबिया, सुदान या देशातील कच्च्या व पांढऱ्या साखरेची गरज नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळात भागविण्याची सुसंधी भारतासमोर आहे. ब्राझीलचा साखर हंगाम यंदा कमी उसामुळे पुढील महिनाअखेर संपुष्टात येईल व थायलंडची साखर जानेवारीअखेर जागतिक बाजारात पोचणार असल्याने या संधीचा सभासद कारखान्यांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन ओपन - जनरल - लायसन्स अंतर्गत अधिकाधिक साखर निर्यात करावी, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणावरून प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'या' समाजानेच टिकवली लोकशाही

साखरेच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झालेली असली तरी हे दर साखरेच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत अजूनही कमी आहेत. या दरात आणखी सुधारणा होण्यासाठी सभासद कारखान्यांनी बाजाराचा दैनंदिन अभ्यास, आढावा घेऊन कोट्यातील साखर विक्री करणे श्रेयस्कर राहील.

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

आयएसओ, एफ.ओ.लीच, डेटा ऍग्रो व ग्लोबल फ्लॅट या संस्थांनी केलेल्या जागतिक सर्वेक्षणांमधून साखर वर्ष 2020-21 मध्ये साधारणतः साखरेची उपलब्धता मागणीपेक्षा 43 ते 45 लाख टन कमी राहणार आहे. हे लक्षात घेता स्टोन एक्‍स, रोबो बॅंक व इतर विश्वासार्ह संस्थांकडून कच्च्या साखरेचा जागतिक साखर बाजार 20 ते 21 सेंट्‌स प्रतिपाउंड (3168 ते 3340 रुपये प्रतिक्विंटल एक्‍समिल) राहण्याचा अंदाज आहे. तरी याबाबत कारखान्यांनी आपल्या स्तरावरून सतत बदलणाऱ्या जागतिक साखर परिस्थितीची अद्ययावत माहिती घेऊन साखर विक्रीचे धोरण ठरवावे.

- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

loading image
go to top