राज्यातील साखर उत्पादनात २९८ लाख क्विंटलने वाढ

राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात २२ मे अखेरपर्यंत १३ कोटी नऊ लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.
sugar
sugarsakal
Summary

राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात २२ मे अखेरपर्यंत १३ कोटी नऊ लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

पुणे - राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात २२ मे अखेरपर्यंत १३ कोटी नऊ लाख ३५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या गाळपातून १३ कोटी ६२ लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा २ कोटी ९८ लाख ५६ हजार क्विंटल इतके साखर उत्पादन वाढले आहे.

दरम्यान अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी येत्या ३१ मेपर्यंत साखर कारखाने चालू ठेवण्याचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व कारखान्यांना दिला आहे. यामुळे या आठवडाभरात आणखी ७२ लाख ११ हजार ७०० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण होईल, अशी शक्यता साखर आयुक्तालयातून वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील ऊस गळीत हंगाम संपत आला तरीही काही कारखान्यांच्या क्षेत्रातील उस शिल्लक राहिला होता. या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी नजीकच्या कारखान्यांकडून या उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाने सर्व कारखान्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात याच तारखेपर्यंत १० कोटी १३ लाख ५३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते. या उस गाळपातून १० कोटी ६३ लाख ९५ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते, असे साखर आयुक्तालयाने उस गाळपाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

राज्यात यंदा सुमारे १२ कोटी ५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होइल, असा अंदाज हंगाम सुरू होताना साखर आयुक्तालयाने गृहित धरला होता. परंतु प्रत्यक्षात या अंदाजाहून अधिक उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

यंदाचा गळीत हंगाम दृष्टीक्षेपात

  • राज्यातील सुरू असलेले कारखाने ---- २००

  • सुरू कारखान्यांपैकी सहकारी ---- १०१

  • सुरू असलेले खासगी कारखाने ---- ९९

  • बंद असलेले कारखाने ---- १४०

  • सुरू असलेल्या सर्व कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ---- ८ लाख १ हजार ३०० मेट्रिक टन

  • आतापर्यंत पूर्ण झालेले गाळप ---- १३ कोटी ९ लाख ३५ हजार मेट्रिक टन.

  • आतापर्यंतचे एकूण साखर उत्पादन ------ १३ कोटी ६२ लाख ५१ हजार क्विंटल

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढलेले गाळप ---- ३ कोटी ६७ लाख ९३ हजार मेट्रिक टन

  • यंदा साखर उत्पादनात झालेली वाढ ----- २ कोटी ९८ लाख ५६ हजार क्विंटल

  • यंदाचा सरासरी साखर उतारा --- १०.४० टक्के.

विभागनिहाय पूर्ण झालेले ऊस गाळप (मेट्रिक टनमध्ये)

  • कोल्हापूर --- २ कोटी ५४ लाख ६९ हजार

  • पुणे ---- २ कोटी ६९ लाख ४८ हजार

  • सोलापूर ---- २ कोटी ९९ लाख २५ हजार

  • नगर ---- १ कोटी ९७ लाख ५३ हजार.

  • औरंगाबाद ---- १ कोटी २८ लाख ९३ हजार

  • नांदेड ---- १ कोटी ४४ लाख ९४ हजार

  • अमरावती ---- १० लाख ३ हजार

  • नागपूर ---- ४ लाख ५० हजार.

विभागनिहाय साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)

  • कोल्हापूर --- ३ कोटी ४१ हजार

  • पुणे ---- २ कोटी ९० लाख ८ हजार

  • सोलापूर ---- २ कोटी ८३ लाख ०७ हजार

  • नगर ---- १ कोटी ९७ लाख ९४ हजार.

  • औरंगाबाद ---- १ कोटी २६ लाख ०४ हजार

  • नांदेड ---- १ कोटी ५० लाख ७८ हजार

  • अमरावती ---- ०९ लाख ६७ हजार

  • नागपूर ---- ०३ लाख ८० हजार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com