विक्रीसाठीची साखर 23 मेनंतर रोखणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

कोल्हापूर - राज्यात या वर्षी संपलेल्या साखर हंगामातील उसाचा दुसरा हप्ता 22 मेपर्यंत देण्याची मुदत संपली असून 23 मेपासून कोणत्याही क्षणी कारखान्यांतून विक्रीसाठी बाहेर पडणारी साखर रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिला. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर 4 मे रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातच राजू शेट्टी यांनी कारखान्यांना 22 मेपर्यंत दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी साखर रोखू, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर काटे म्हणाले, ""22 मेची संघटनेने दिलेली मुदत संपत आली आहे; पण एकाही कारखान्यांकडून दुसऱ्या हप्त्याबाबत प्रस्ताव आलेला नाही. साखरेचे मूल्यांकन वाढले आहे. बाजारातील साखरेचे दरही चांगले आहेत. याशिवाय उपपदार्थांचे दरही वाढल्याने कारखान्यांना चांगला फायदा होत आहे. हा विचार करूनच कारखान्यांनी दुसरा हप्ता प्रतिटन 500 रूपये तातडीने द्यावा, ही आमची मागणी आहे; पण कारखाने याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.''

Web Title: Sugar for sale will be stopped after May 23