

sugarcane FRP Increase central government
esakal
FRP 3650 per ton Maharashtra : येणाऱ्या हंगामात (२०२६-२७) गाळपास येणाऱ्या उसाच्या एफआरपीत केंद्राने प्रतिटन १०० रुपयांची वाढ केली आहे. २०२५-२६ हंगामासाठी एफआरपी ३५५० होती. ती आता ३६५० रुपये इतकी केली आहे. १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ही रक्कम उत्पादकांना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज ही वाढ केली.