Sugarcane FRP : उसाची एफआरपी एकाच टप्प्यात, की दोन तुकड्यांत? निकाल ठेवला राखून

राज्य सरकारने उसाच्या एफआरपीचे दोन टप्पे केल्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेववरील सुनावण्या आणि वाद-प्रतिवाद अखेर आज थांबले.
sugarcane
sugarcanesakal
Updated on

सोमेश्‍वरनगर, (जि. पुणे) - राज्य सरकारने उसाच्या एफआरपीचे दोन टप्पे केल्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेववरील सुनावण्या आणि वाद-प्रतिवाद अखेर आज थांबले. साखर संघाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण आणखी लांबले होते. आता हे प्रकरण न्यायालयाने अंतिम निकालासाठी राखून ठेवले असून, राज्यातील ऊसउत्पादकांचे निकालाकडे डोळे लागले आहे.

केंद्राच्या ऊस नियंत्रण कायद्यान्वये परंपरेप्रमाणे गत हंगामाच्या उताऱ्यानुसार एकरकमी एफआरपी (रास्त व उचित दर) ऊस तुटल्यावर १४ दिवसांत अदा केली जात होती. राज्य सरकारने २१ फेब्रुवारी २०२२ला एफआरपीचे दोन टप्पे केले. १०.२५ टक्के या पायाभूत उताऱ्यानुसार पहिला हप्ता आणि हंगाम संपल्यावर चालू उताऱ्यानुसार एफआरपी निश्‍चित करून उर्वरित हप्ता द्यावा, असे आदेश काढले.

याविरोधात आंदोलने झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री व अधिकाऱ्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे आश्‍वासन दोन वेळा दिले. मात्र, अधिकृत शासन निर्णय होत नसल्याने शेट्टी न्यायालयात गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे इतिवृत्तही सादर केले. चार सुनावण्या होऊन १३ फेब्रुवारीला निकालाची शक्यता होती. केंद्र सरकारच्या कायद्यात बदल केल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरेही ओढले होते.

असे असतानाच राज्य सहकारी साखर कारखाना संघाने अचानक हस्तक्षेप केला. यामुळे पुन्हा एकदा मंगळवारी (ता. १८) या एकाच प्रकरणावर राज्याचे महाभियोक्ता, साखरसंघाचे वकील व याचिकाकर्त्यांचे वकील यांच्यात दिवसभर युक्तिवाद रंगले. आजही (ता. २०) याबाबत चार तास सुनावणी चालली. राजू शेट्टीही उपस्थित होते. युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रकरण निकालासाठी राखून ठेवले असून, येत्या एक-दोन आठवड्यात एफआरपी एकरकमी मिळणार, की तुकडे कायम राहणार? हे समजणार आहे.

दोन्ही सुनावण्यात राजू शेट्टी यांच्यावर वैयक्तीक टीप्पणी करण्याचा प्रयत्न झाला. सरकारच्या प्रतिनिधींनी निर्णय कायम ठेवण्याची मागणी केली. साखर संघानेही चालू हंगामाच्या उताऱ्यानुसार एफआरपी देणे उचित असल्याचे सांगितले आहे. मात्र एफआरपीचे तुकडे केल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे दहा हजार कोटी थकले असून, माजी खासदारांना न्याय मागायला तीन वर्षे लागतात, सामान्य शेतकरी कसा पोहोचणार, अशी मांडणी आम्ही केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकरकमी एफआरपीचे आजच समर्थन केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल याचा विश्‍वास आहे.

- अॅड. योगेश पांडे, राजू शेट्टी यांचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com