Suicide case : 'मुलांना कर्जबाजारी होऊन शिकवले मात्र...' फेसबुक पोस्ट करत पित्याची आत्महत्या

फेसबुकवर खुप भावनिक पोस्ट : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील घटना
suicide case
suicide casesakal media

पाचोड : भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपप्रमुखाने आपण मुलांना कर्जबाजारी होऊन शिकवले मात्र त्यांना संस्कार देऊ न शकल्याने आपण आत्महत्या करीत असल्याची फेसबुकवर पोस्ट टाकून लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हदयद्रावक घटना दावरवाडी (ता.पैठण) येथे सोमवारी (ता.१०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

यासंबंधी अधिक माहीती अशी , दावरवाडी (ता.पैठण) येथील दत्तात्रय राधाकिसन सोरमारे (वय ४९ वर्षे) यांस तीन मुली व एक मुलगा असे चार अपत्ये असून एका मुलीचे लग्न झाले तर एक मुलगा व दोन मुली लग्नास आले असून यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले. सोमवारी (ता.१०) साडेदहा वाजेच्या दरम्यान दत्तात्रय सोरमारे यांनी फेसबुकवर मी मुलांना ग्रॅज्यूएटपर्यंत शिक्षण देण्यापायी कर्जबाजारी झालो ,

त्याना मी शिक्षण दिले परंतु संस्कार देण्यास कमी पडलो म्हणून मी आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली. व कुणाला काही एक न सांगता ते साडेदहा वाजता घराबाहेर पडले.फेसबुकवरील गावांतील मित्रानी त्यांस फोन केला मात्र त्यांनी कुणाचे फोन घेतले नाही. जेव्हा त्याच्या कुटुबियांना ही माहिती मिळाली तेव्हा ग्रामस्थांसह कुटुंबिय त्याच्या शोधार्थ घराबाहेर पडले. यासंबंधी काहींनी पाचोड पोलीसांनाही घटनेची माहीती दिली.

पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी सायबर शाखेला ही माहीती कळवून लोकेशन घेतले व स्वतः सहकार्‍यासमवेत त्याचा शोध सुरु केला असता रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्याचा दावरवाडी -पैठण रस्त्यावर लिंबाच्या झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यावेळी त्याने शेवटी स्वतः एक 'सेल्फी' फोटो काढुन अपलोड केला असल्याचे दिसले.

समोरील दृश्य पाहुन कुटूंबियासह ग्रामस्थांना धक्काच बसला. त्याने फेसबुकवर खुप भावनिक पोस्ट लिहीली होती. सदरील पोस्ट वाचुन मित्रांना अश्रु अनावर झाले. त्यास उपचारार्थ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपस्थित वैद्यकिय अधिकारी डॉ. यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. मंगळवारी (ता. ११) सकाळी उतरणीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दुपारी शोकाकूल वातावरणात त्याचेवर दावरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.    

दत्तात्रय सोरमारे यांने आत्महत्येपूर्वी फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, "प्रिय मित्र आणि नातेवाईक तुम्हाला सांगताना माझा कंठ अतिशय दाटून येत आहे. कारण मी तुम्हाला यानंतर कधीही भेटणार नाही.माझेकडे काही मित्रमंडळीचे जे काही पैसे आहे. माझी प्रामाणिक इच्छा होती की मी आज ना उद्या तुमचे पैसे देईल.

पण माझेवर असं काही प्रसंग आला आहे की मला नाइलाजाने आत्महत्या करावी लागत आहे. कारण माझ्यावर असा काही प्रसंग आला की मी कोणालाही तो सांगू शकत नाही. कारण माझे एक स्वप्न होते की माझं कुटुंब ग्रॅज्युएट कराव . त्यामुळे मी माझ्याकडून मुलांचे उच्च शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न केले. कधी मला अडचण आली तरी मी कोणाकडेही हात पाय पसरले आणि त्यांचे शिक्षण केले.

पण त्याचे फळ म्हणून मला आज आत्महत्या करावी लागत आहे. कारण मी सगळं काही करू शकलो, पण माझ्या मुलांना मी संस्कार देऊ शकलो नाही. त्यामुळे मी आज फाशी घेत आहे. कोर्ट कधी सजा देईल नाही देईल. पण मी असा निर्णय घेतला की माझ्या गुन्ह्याची मला सजा मिळायला पाहिजे. कारण की मी माझ्या मुलांचे शिक्षण करून फार मोठी चूक केलेली आहे. काही माझी हितचिंतक असतील,

माझे नातेवाईक असतील त्यांना माझा हा निर्णय पटणार नाही. पण मित्रहो मला माफ करा. हा निर्णय माझाच आहे आणि तुम्ही मला खरंच माफ करताल असं  वाटत नाही. तर कृपया मला माफ करावं , एवढीच हात जोडून विनंती"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com