
या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सुजात आंबेडकरांचं वादग्रस्त विधान, म्हणाले दंगल पेटवणारे सहसा..
मागील काही दिवसांपूर्वी सुजात आंबेडकर हे नाव चर्चेत आले आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा: राज्यात लोडशेडींग आणखी वाढणार! अडीच हजार मेगावॅट वीजेची तूट
यावेळी सुजात म्हणाले, आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ती बहूजन वर्ग असतो. यावेळी राज ठाकरेंसंदर्भाती प्रश्नावर ते म्हणाले, राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा, असेही सुजात यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी बोलताना सुजात यांनी भाजप आणि मनसेवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन भाजप सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर यावर कुणीही बोलायला तयार नाही. करोना काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. त्यावर कुणीही बोलत नाही. असे असतानाही जर भाजप किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर बोलत असेल तर त्याचा सरळसरळ असा अर्थ होतो की, येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. जेणेकरून महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष जाऊ नयेत, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: नागपूर | लग्नातच वधुच्या भावाला चाकुने भोसकलं, गाणी लावण्यावरून वाद आला जीवाशी
Web Title: Sujat Ambedkar Controversial Statement Against Brahmin Community Son Of Prakash Ambedkar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..