Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

NCP Pratap Deshmukh News: प्रताप देशमुख यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात वैयक्तिक कारणे दिली आहेत.
NCP Pratap Deshmukh

NCP Pratap Deshmukh

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनुसार, ते लवकरच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. प्रताप देशमुख यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com