Sunil Kedar : सुनील केदार यांची कारागृहातून सुटका; पोलिसांची योग्य ती खबरदारी...

सुनील केदार यांना मंगळवारी जामीन मंजूर झाला असून बुधवारी त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
Sunil Kedar
Sunil Kedaresakal

नागपूरः नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी दोषी ठरवत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनिल केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. २२ डिसेंबर २०२३ रोजी या शिक्षेची सुनावणी झाली होती. त्यानंतर जामिनासाठी केदार यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.

सुनील केदार यांना मंगळवारी जामीन मंजूर झाला असून बुधवारी त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. शिवाय नागपूर शहरातून रॅली काढून आनंद साजरा केला जात आहे. गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतल्याची माहिती आहे. सुनील केदार यांना मागील रस्त्याने बाहेर आणले असून गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

Sunil Kedar
रिलायन्स ही गुजराती कंपनी होती आणि भविष्यातही गुजराती कंपनी राहील; मुकेश अंबानींचे वक्तव्य चर्चेत

कार्यकर्ते जल्लोष करत रॅलीमध्ये सहभागी झाले आहे. संविधान चौकाकडे रॅली निघाली आहे. संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात येणार आहे.

दरम्यान, नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं जामीन मंजूर केला. त्यामुळं केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन कोर्टानं मंजूर केला. तसेच प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sunil Kedar
Uddhav Thackrey: कायदेशीर लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरेंचे दोन शिलेदार निकालाच्या दिवशी अनुपस्थित

नेमकं प्रकरण काय?

सन २००१-२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं होम ट्रेड लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रा. लि., सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस, इंद्रमणी मर्चंट्स प्रा. लि. आणि गलटेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खासगी कंपन्यांच्या सहाय्यानं काही शेअर्स खरेदी केले होते. पण नंतर या कंपन्यांकडून बँकेला हे शेअर्स परत मिळाले नाहीत. यामध्ये १५० कोटी रुपयांच्या बँकेच्या पैशांचा अपहार झाल्याचं सांगितलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com