सुनील पोरवाल गृह विभागाचे अपर मुख्य सचिव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : राज्य सरकारने आज 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची नेमणूक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. तर उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या बदली श्रीवास्तव यांच्या जागी करण्यात आली आहे. 

पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांची उद्योग विभागात, तर वित्त विभागाच्या (सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची शालेय शिक्षण खात्यात बदली झाली आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची सामान्य प्रशासन विभागात (राजशिष्टाचार) नेमणूक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष प्रकल्पासाठी म्हणून नेमणूक करण्यात आलेले प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांची बदली पर्यावरण विभागात झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची बदली वंदना कृष्णा यांच्या जागी वित्त विभागात करण्यात आली आहे. 

उच्च आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची बदली सामान्य प्रशासन विभागात झाली आहे. मुकेश खुल्लर यांची राज्य वीज नियामक आयोगात सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने या खात्याचा अतिरिक्त कार्यभार वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव यूपीएस मदान यांच्याकडे होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंह यांची बदली परिवहन विभागाचे सचिव म्हणून, तर सिंह यांच्या जागी मनोज सौनिक यांची नेमणूक झाली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले एम. एम. सूर्यवंशी यांची नाशिक येथील आदिवासी विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, तर संजय मीना यांची ठाण्यात अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 
 
Web Title: Sunil Porwal Additional Chief Secretary of the Home Department