

Sunil Tatkare on Sharad Pawar
esakal
Sharad Pawar statement Sunetra Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून सुनेत्रा पवार आज सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडीसाठी आज दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल हे देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेले आहेत.