Abdul Sattar : सर्वोच्च न्यायालयातसुद्धा एकनाथ शिंदे यांना न्याय मिळेल

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दिलेला निर्णय हा योग्य पद्धतीने दिलेला आहे.
Eknath Shinde, Abdul Sattar and Uddhav Thackeray
Eknath Shinde, Abdul Sattar and Uddhav Thackeray sakal

पुणे - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दिलेला निर्णय हा योग्य पद्धतीने दिलेला आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे. परंतु राज्यातील जनता ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातसुद्धा उद्धव ठाकरे यांना नव्हे तर, एकनाथ शिंदे यांनाच न्याय मिळेल.शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा भक्कम पाठिंबा असल्याने यापुढची तीन दशके एकनाथ शिंदे हेच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असा दावा राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (ता.१७) पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केला.

शिवसेना पक्षाबाबत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी पक्षपाती आणि बेकायदेशीर निर्णय दिल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच पत्रकार परिषदेत बोलताना केला होता. याबाबत सत्तार यांना प्रश्‍न विचारला असता, त्यांनी हा दावा केला आहे.

सत्तार म्हणाले, ‘याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीचेही तथ्य नाही. शिवसेनाप्रमुख या नात्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही आमचे दैवत मानतो. परंतु उद्धव ठाकरे हे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.’

राज्याच्या पणन मंडळाच्या वतीने पुणे येथे पौष्टिक तृणधान्य (मिलेटस) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सत्तार आज पुण्यात आले होते. या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुढची ३० वर्षे सत्ता राहावी असे वाटते. त्यानुसार मलासुद्धा एकनाथ शिंदे हे यापुढची तीन दशके मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असे वाटत आहे.’

अब्दुल सत्तार म्हणाले...

- शिवेसेनेइतकेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या पाठीशी आहेत.

- त्यामुळे खरी राष्ट्रवादी कॉँगेस ही अजित पवार यांचीच आहे.

- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अजित पवारांच्या बाजूने निर्णय देतील.

- हातकणंगले लोकसभेची जागा शिवसेनेची आहे, ती पुन्हा शिवसेनेकडेच राहील.

- लोकसभेची खासदारकीची जागा सदाभाऊ खोत यांनी मागण्याचा संबंधच येत नाही.

- जितेंद्र आव्हाड यांचा बोलविता धनी दुसराच आहे.

- आव्हाड यांनी बेताल वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करू नये.

- राज्यासाठी नवे विधानभवन बांधण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे.

- शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुले त्यांच्या वक्तव्यावर बोलणे उचित होणार नाही.

- शेतकऱ्यांबरोबरच कांदा खाणाऱ्यांचाही विचार करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com