आता सगळे लक्ष हंगामी अध्यक्षांकडे; हे आहेत उमेदवार

vidhan bhawan
vidhan bhawan

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उद्याच विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश हंगामी अध्यक्षांना दिले आहेत. आता हंगामी अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडून निवड करण्यात येईल.

महाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच या सर्व घडामोडींचे लाईव्ह चित्रिकरण करावे लागणार आहे. यासाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आवाजी मतदानाने मतदान न घेता गुप्त मतदान घ्यावे असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

हंगामी अध्यक्षपदी कोण, याची चर्चा सुरु असताना यांची नावे चर्चेत आहेत. बाळासाहेब थोरात आणि बबनराव पाचपुते या दोघांची नावं  सर्वात आधी पुढे आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच आता आणखी काही समोर येतायत. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, के. सी. पाडवी, दिलीप वळसे पाटील यांची नावं आहेत. यापैकी एकाची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड राज्यपाल करतील. बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. संगमनेर मतदारसंघातून ते सलग 8 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. भाजपचे बबनराव पाचपुते 1980 पासून विधानसभेवर निवडून जात आहेत. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वर्षी ते निवडणुकीत पराभूत झालेत. यामध्ये भाजपकडून बबनराव पाचपुतेंचं नाव पुढे रेटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

कोण होते हंगामी अध्यक्ष 
नवी विधानसभा स्थापन झाल्यानंतर त्या सदनात सर्वाधिक काळ असणाऱ्या किंवा निवडून आलेल्या सर्वांत ज्येष्ठ सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून निवडलं जातं. विधिमंडळ सचिवालयाकडून हे नाव राज्यपालांना पाठवलं जातं. त्यानंतर राज्यपालांकडून त्या सदस्याला शपथ दिली जाते. त्यानंतर निवडून आलेल्या 288 सदस्यांना शपथ देण्याची जबाबदारी हंगामी अध्यक्षांवर असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com