
नवी दिल्ली : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला आहे. यामुळे दोषी पोलिसांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या खटल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या बाजूने युक्तिवाद केला होता.