esakal | माझ्या बहिणी सक्षम, आयकर विभागाच्या छापेमारीनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार सुप्रिया सुळे

माझ्या बहिणी सक्षम, Income Tax च्या छापेमारीनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर सध्या आयकर विभागाची छापेमारी (Income tax raid) सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता पवार घराण्याच्या लेक तथा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya sule) यांनी देखील या आयकर विभागाच्या छापेमारीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: '...म्हणून आमच्या घरी आयकर विभागाचा पाहुणचार'

''सार्वजनिक जीवनातील लोकांना तपास यंत्रणांकडून टार्गेट केलं असेल तर त्याचं तितकं काही वाटत नाही. मात्र, कुटुंबातील महिलांना टार्गेट करणं कितपत योग्य आहे. याची मला खंत वाटते. पण, महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकला नाही. आयकर विभागाच्या कारवाईला माझ्या तिन्ही बहिणी घाबरत नाहीत. माझ्या तिन्ही बहिणी सक्षम आहेत. आम्ही खंबीर लेकी आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, गुरुवारपासून अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे.

अजित पवार काय म्हणाले होते? -

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मला एका गोष्टीचं दुख आहे, ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरू आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर छापे टाकले. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, असा इशारा पवारांनी दिला होता.

loading image
go to top