esakal | केरळची प्रगती एलडीएफ करेल; सुळेंनी शुभेच्छा देत व्यक्त केला विश्वास

बोलून बातमी शोधा

Supriya Sule Pinarayi Vijayan
केरळची प्रगती एलडीएफ करेल; सुळेंनी शुभेच्छा देत व्यक्त केला विश्वास
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज (रविवार) लागला. केरळमध्ये डाव्यांच्या नेतृत्वाखाली LDF ने पुन्हा सत्ता मिळवली आहे. मागच्या ४० वर्षांपासून केरळमध्ये कुठल्याही आघाडीला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केरळमधील ही परंपरा खंडीत झालेली आहे. मागची चार दशक केरळच्या जनतेने डाव्याच्या नेतृत्वाखाली LDF आणि काँग्रेस प्रणीत UDF ला आलटून-पालटून संधी दिली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफने 84 जागांवर सत्ता मिळवली आहे.

या यशाबद्दल मुख्यमंत्री पिनराई विजयन Pinarayi Vijayan यांचे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी टिवि्ट करुन अभिनंदन केले आहे. केरळच्या विकासासाठी एलडीफ कार्यरत राहील असा विश्वास सुळे यांनी व्यक्त करुन सर्व एलडीफच्या कार्यकर्ते, पदाधिका-यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

केरळमध्ये एलडीएफ सर्वाधिक 84 जागांवर विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखील हे यश मिळाले आहे. काँग्रेस 45 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा: 'अजित पवारांना शोधा...! घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय'

हेही वाचा: दांपत्यास पोलिसाने सोने- चांदीच्या दागिन्यांची पर्स केली परत

हेही वाचा: आम्हीच जिंकू; चंद्रकांतदादांनी सरकार कसं पडेल तेही सांगून टाकलं