esakal | 'अजित पवारांना शोधा...! घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय'
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Rane Ajit Pawar

'अजित पवारांना शोधा...! घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय'

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवाताडे हे विजयाच्या उंबरठ्यावर पाेचले आहेत. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी भगीरथ भालके यांच्यापेक्षा सुमारे 4395 मतांची आघाडी घेतली आहे. या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चांद्यापासून बांध्यापर्यंतचे नेते साेशल मिडीयाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे जनतेने उत्तर दिल्याचे म्हणत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग? असे टिवि्ट केले आहे.

या निवडणुकीच्या मतमाेजणीत भाजपचे समाधान आवताडे यांनी 35व्या फेरीअखेर मतांची आघाडी कायम राखली असून, त्यांना 35व्या फेरीत 1 लाख 1,01,607 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 97,212 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे यांनी 4,395 मतांची आघाडी घेतली आहे. आणखी काही फेऱ्यांमध्ये आवताडेंनी लीड कायम ठेवल्यास त्यांचा विजय फायनल असेल. त्यांच्या विजयापुर्वीच राज्यातील नेते साेशल मिडीयावर सक्रिय झाले आहेत.

सेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'

आमदार निलेश राणे म्हणतात महाराष्ट्रमध्ये पंढरपूरची सीट राखता राखता महाविकास आघाडीचे कपाळात आलेत आणि वार्ता छातीठोकपणे बंगालची करतायेत. अरे बंगालमध्ये बीजेपी हरली तरी ३ वरून १०० जवळ चालले तुम्ही साले ३ पक्ष एकत्र येऊन सुद्धा पंढरपूर पोटनिवडणुकीत बीजेपी ने तुमचा घाम काढला.

हेही वाचा: Pandharpur Elections : आवताडेंचा विजय पक्का ! कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?

माजी खासदार नितेश राणेंनी पंढरपुर पोटनिवडणुकीत महाविकासचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री

सगळे गल्ली गल्ली फिरले तरीही लोकानी नाकारले असे म्हटले आहे.

फक्त औपचारिकता बाकी आहे जयघोषाची...

loading image
go to top