esakal | दांपत्यास पोलिसाने सोने- चांदीच्या दागिन्यांची पर्स केली परत

बोलून बातमी शोधा

Traffic Police Returned Purse On Tasawade Toll Plaza
दांपत्यास पोलिसाने सोने- चांदीच्या दागिन्यांची पर्स केली परत
sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (जि. सातारा) : गावाकडे आई आजारी असल्याने गडबडीत पुण्याहून इचलकरंजीकडे (जि. सांगली) दुचाकीवरून निघालेल्या दांपत्याची तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्‍यावर सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची पर्स पडली. तळबीड पोलिस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी नीलेश विभूते यांना ती सापडली. त्यांनी ती सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित दांपत्याला प्रामाणिकपणे परत केली.

तळबीडचे वाहतूक कर्मचारी विभूते हे आज सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे तासवडे टोलनाक्‍यावर कर्तव्य बजावत होते. त्या दरम्यान त्यांना टोलनाक्‍यावरील पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवर एक पर्स पडल्याचे दिसले. त्यांनी त्या पर्सची तपासणी केल्यावर त्यांना त्यात सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, मोबाईल असल्याचे दिसले. त्यांनी ती पर्स सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्याकडे देत त्यांना माहिती दिली.

Good News - लहान मुलांना आणि छाेट्या बालकांवर आमच्या सिव्हील हाॅस्पिटलच्या तज्ञांनी आत्तापर्यंत 1500 जणांना काेविड 19 मधून केले मुक्त, वाचा सविस्तर

त्यानंतर त्यांनी पर्समधील ओळखपत्र, मोबाईलवरून ती पर्स मूळचे इचलकरंजीचे, मात्र नोकरीनिमित्त पिरंगुट (जि. पुणे) येथे वास्तव्यास असणाऱ्या सुनील खांडेकर, पूनम खांडेकर यांची असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून नातेवाइकांना संपर्क साधून माहिती दिली. नातेवाइकांनी खांडेकर दांपत्याला संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर खांडेकर हे तासवडे टोलनाक्‍यावर पोचले. त्यांची पर्स सौ. पाटील यांनी खांडेकर यांना विभूतेंच्या उपस्थितीत परत केली.

फक्त औपचारिकता बाकी आहे जयघोषाची...