गडकिल्यांचे संवर्धन करायचे साे़डून, हे काय केले : सुप्रिया सुळे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

विराेधी पक्षांनी गड-किल्यांबाबत फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयावर जाेरदार टीका केली आहे. अमोल कोल्हे, धनजंय मुंडे यांनी याचा जोरदार विरोध केला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या निर्णयाचा व्टिटरवरती प्रखर शब्दात समाचार घेतला आहे. 

मुंबई : राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच यामुळे पर्यटन वाढवण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतू या निर्णयावरून सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. अमोल कोल्हे, धनजंय मुंडे यांनी याचा जोरदार विरोध केला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या निर्णयाचा व्टिटरवरती प्रखर शब्दात समाचार घेतला आहे. 

Video : औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं! : अमाेल काेल्हे

छत्रपतींचे किल्ले देणार लग्नासाठी; सरकारचा संतापजनक निर्णय

सुळे यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे. 

गडकिल्ल्यांना हात लावाल तर याद राखा : धनंजय मुंडे

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने किल्ल्यांचा विकासात कोणत्या गोष्टी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात यासंबंधी धोरण आखलं आहे. पर्यटन सचिव विनिता वैद सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्य मंत्रीमंडळाने नव्या धोरणाला संमती दिली आहे. हेरिटज पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे,”. परंतू या निर्णयाचे पडसाद सद्या सोशल मिडियामध्ये उमटताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya sule criticize bjp government forts heritage hotels wedding venues issue on tiwtter