सुप्रिया सुळे यांना डेंग्यूची लागण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. पण ऐन प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी डेंग्यूची लागण झाली आहे. ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला असून मला डेंग्यूची लागण झाली असल्याचे सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितले आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. पण ऐन प्रचाराच्या धामधुमीत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी डेंग्यूची लागण झाली आहे. ऐन प्रचाराच्या धामधुमीत सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज आहे. परंतु डासांचा उच्छाद अखेर भोवला असून मला डेंग्यूची लागण झाली असल्याचे सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितले आहे.

डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे, असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या एकूण शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय 70 नेत्यांचा समावेश आहे.

 राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना आज राज्य सहकारी बॅंकेच्या कथित घेटाळ्यावरून ईडीने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप शिवसेनेसह इतर पक्षातील 70 संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शरद पवार यांचेही नाव असून त्यामुळे गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule down with Dengue fever