राष्ट्रवादीच्या संसदीय गटनेतेपदी सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी हे पद पक्षातून बाहेर पडलेले तारीक अन्वर यांच्याकडे होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची बाजू लोकसभेत मांडण्याची जबाबदारी आली आहे. 

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहे. तत्पुर्वी त्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या होत्या. आपल्या आतापर्यंतच्या संसदीय कारकीर्दीत सुप्रिया सुळे यांनी अभ्यासू खासदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळविले आहे. याशिवाय संसदेतील उत्तम कामगिरीच्या जोरावर संसदरत्नसह विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती, सर्वाधिक प्रश्न विचारणे, आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडून त्यांवही तड लागेपर्यंत पाठपुरावा करणे या त्यांच्या कामगिरीसाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून अगदी अलीकडेच युनिसेफ या जागतिक संघटनेचाही पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

Web Title: supriya Sule Elected at the parliamentary group leader post