शिवराय आणि रामदासांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही - सुप्रिया सुळे

supriya sule gave evidence of court verdict on the statement made by bhagat singh koshyari about shivaji maharaj
supriya sule gave evidence of court verdict on the statement made by bhagat singh koshyari about shivaji maharaj sakal

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यानी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे एका नव्या वादात सापडले आहेत. 'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?' असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारींनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात केलं, त्यानंतर त्यांच्यावर सर्व बाजूनी टिका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे म्हणत त्याबाबतचा न्यायालयाचा दाखला देखील दिला आहे.

सुळे यांनी ट्विट करत, मुंबई न्यायालयाच्या निकालाची प्रत ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

supriya sule gave evidence of court verdict on the statement made by bhagat singh koshyari about shivaji maharaj
बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये, जे लोक सांगतात रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर रामदास नव्हते, असं शरद पवारांनी म्हटलंय. ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं, असं पवार एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.

supriya sule gave evidence of court verdict on the statement made by bhagat singh koshyari about shivaji maharaj
'हिट अँड रन' पिडीतांना सरकारचा दिलासा; आता 8 पट वाढवून मिळणार मदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com