सुप्रिया सुळे, बारणे यांना संसदररत्न पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चेन्नई येथील राजभवनमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चेन्नई येथील राजभवनमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राइम पॉइंट फाउंडेशनतर्फे संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. खासदार सुळे व बारणे यांची संसदेमधील उपस्थिती, चर्चासत्रांमधील सहभाग, उपस्थित प्रश्न आणि पटलावर मांडलेली खासगी विधेयके यातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला. माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती; तसेच प्राइम पॉइट फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन के. श्रीनिवासन आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

गेल्याच आठवड्यात सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत ‘राइट टू डिस्कनेक्‍ट’ हे खासगी विधेयक मांडले. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सुप्रिया सुळे यांच्या कारकिर्दीबाबत विशेष उल्लेख करत त्यांचे कौतुक केले.

प्राइम पॉइंट फाउंडेशनने केलेला हा गौरव नक्कीच माझा आनंद द्विगुणित करणारा आहे. हा पुरस्कार बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे, अशा भावना सुळे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या.

Web Title: Supriya Sule Shrirang Barne has been given the Parliamentary Award