सुप्रिया सुळेंनी मानले मुंबई पोलिसांचे आभार, म्हणाल्या..

माझी विनम्रपणे विनंती आहे की सर्वांनी शांतता राखावी - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेgoogle
Summary

माझी विनम्रपणे विनंती आहे की सर्वांनी शांतता राखावी - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. यावेळी एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले असून त्यांनी चप्पल आणि दगडफेक करत निषेध जाहीर केला आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे या थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या आहेत. माझी सर्व कर्मचाऱ्यांशी बोलण्याची तयारी आहे. मात्र, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा पर्याय त्यांनी संतप्त कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे मुंबई पोलिसांचे आभार मानत म्हणाल्या, मुंबई पोलिसांनी माझ्या आई आणि कुटुंबीयांसाठी जे काही केलं त्याबद्दल मनापासून आभार मानते. मी हात जोडून विनंती करते, सर्वांनी शांतता राखा. माझी विनम्रपणे विनंती करते यावर आपण शांततेत बसुन चर्चा करु असंही त्या म्हणाल्या आहेत. माझी आई आणि मुलगी घरात आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करू दे. त्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी शांततेच्या मार्गाने संवाद साधायला तयार आहे, अशी विनंता सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे
'माझी आई आणि मुलगी घरात..' सुप्रिया सुळे थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात

पुढे त्या म्हणाल्या, एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश आणि राग मी समजू शकते परंतु असं काहीही न करता आपण शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवूया. तुमच्या समस्यांसाठी आपण चर्चेला बसू शकतो. माझी विनम्रपणे विनंती आहे. सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. माझ्या घरावर हल्ला झाला असून हे दुर्दैवी आहे. मात्र मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते. आपल्या राज्याच्या परंपरेला हे धरून नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एसटीच्या निलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं त्यांनी म्हटलं. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकर न होण्यामागचे सूत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारने १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.

सुप्रिया सुळे
शरद पवार हाय हाय... एसटी कर्मचाऱ्यांची 'सिल्व्हर ओक'वर चप्पलफेक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com