
'त्याचा हात तोडून हातात देईन', सुप्रिया सुळे भडकल्या
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आली.
अमित शाह यांच्या आयुष्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. (Supriya Sule News)
हेही वाचा: "चूक राष्ट्रवादीची असेल तर..."; पुण्यातल्या राड्यानंतर गृहमंत्र्यांची भूमिका
त्यातून मोठा गोंधळ निर्माण झाला. यामध्ये राष्ट्रवादी नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाणही करण्यात आली. त्याता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय नाट्य रंगलं आहे. पुण्यात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल झाली असून राष्ट्रवादीच्या काही जणांवरही तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं.
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारणाऱ्या भाजपला सुळे यांनी चांगलंच सुनावलं आहे. हे राज्य शाहू, फुले आंबेडकरांचं आहे. त्यामध्ये महिलांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आम्हाला गरज पडली तर, कोर्टात जाऊ आणि ऐकायला तयार नसतील अशा लोकांचे हात तोडून हातात देऊ, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Web Title: Supriya Sule Warms Bjp Over Smriti Irani Pune Visit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..