"चूक राष्ट्रवादीची असेल तर..."; पुण्यातल्या राड्यानंतर गृहमंत्र्यांची भूमिका

पुण्यातल्या स्मृृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपा नेत्याने मारहाण केली.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी (Minister Smriti Irani) अमित शाह यांच्या आयुष्यावरील एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले, त्यातून मोठा गोंधळ निर्माण झाला. यामध्ये राष्ट्रवादी नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाणही करण्यात आली. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, "चूक कोणाची आहे, त्याप्रमाणे जर राष्ट्रवादीची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील आणि भाजपाची असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणं ही आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई अभिप्रेत आहे ती कारवाई होईल".

Dilip Walse Patil
राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडेंना मारहाण; भाजपा नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा

महाविकास आघाडीत कुरबुरी?

"मला वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र काम करतायत. एखाद्या लहान मोठ्या प्रश्नावरून मतभेद झाला तर लगेच त्याचा अर्थ महाविकास आघाडीत गडबड आहे, असं काढायचं कारण नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला भाजपासोबत लढायचं आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र काम केलं पाहिजे".

Dilip Walse Patil
राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर; शहर मनसेतील खदखद दूर करणार?

राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला परवानगी देणार का?

"पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारण्याचं काही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस त्यांना परवानगी देतील. पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करून त्यांनी सभा घ्यावी".

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com