Supriya Sule WhatsApp Status: 'कितीबी समोर येऊदे....'; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत, का ठेवलं स्टेटस?

Supriya Sule WhatsApp Status: सुप्रिया सुळे या टेक्नोसॅव्ही म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या स्टेटस, फेसबुकच्या माध्यमातून प्रचार सुरु केला आहे. अशातच त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवलेला फोटो आणि गाणं चर्चेत आलं आहे.
Supriya Sule WhatsApp Status
Supriya Sule WhatsApp StatusEsakal

पुणे: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडीयावर विविध पोस्टचा पाऊस पडत आहे. राज्यातील हाय व्होल्टेज लढत म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे आता स्पष्ट झाले असून दोन्ही बाजूंकडून प्रचाराला प्रारंभही झाला आहे. सुप्रिया सुळे या टेक्नोसॅव्ही म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या स्टेटस, फेसबुकच्या माध्यमातून प्रचार सुरु केला आहे.

Supriya Sule WhatsApp Status
Viral Letter: मम्मी-पप्पाला अटक करा अन्...; तिसरीतील साईरामचे पोलिस काकांना पत्र

आजही सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसला 'किती बी येऊ द्या त्यांना एकटा बास' हे गाणं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर ठेवलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने शरद पवार यांना लक्ष्य केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे हे गाणे चर्चेचा विषय ठरत आहे.

Supriya Sule WhatsApp Status
Weather Update: राज्यात यलो अलर्ट; तर बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

कितीही आले तरी त्यांना एकटे शरद पवार पुरेसे आहेत, असाच याचा अर्थ असून राजकीय मुत्सद्देगिरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हेच सगळ्यांना पुरून उरतील असाच संदेश या स्टेटस द्वारे सुप्रिया सुळे यांनी पोहोचविला आहे.

Supriya Sule WhatsApp Status
...तर शिक्षक होणार बडतर्फ! राजकीय प्रचारात सहभागाची तक्रार आल्यास होईल चौकशी, दोषी आढळल्यास वेतनवाढ, पदोन्नती रोखण्याची किंवा बडतर्फीची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com