
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआय़टीमधील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत आक्षेप असल्याचं त्यांनी फडणवीस यांना सांगितलं. तसंच हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. फडणवीस यांनी यानंतर उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचंही सुरेश धस म्हणाले.