Sushant Singh Rajput: नितेश राणेंकडून सुशांतच्या मृतदेहाचा VIDEO ट्वीट; "बेबी पेंग्विन..."

काही दिवसांपूर्वी सुशांतचं शवविच्छेदन करणारा रुग्णालयातला कर्मचारी समोर आला होता.
SUshant Singh Rajput
SUshant Singh RajputSakal

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचं प्रकरण आता पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. नितेश राणे यांनी सुशांतचा मृतदेह नेतानाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

नितेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,"रुपकुमार शाह सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह घेऊन जात होते, हे स्पष्ट दिसत आहे. त्याच्या शवविच्छेदनाच्या वेळीही शाह तिथे उपस्थित होते. सत्य आता समोर येत आहे. आता बेबी पेंग्विन लांब नाही. न्याय होणारच आहे."

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

SUshant Singh Rajput
Sushant Singh Rajput Death : आत्महत्या नव्हे हत्याच; रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ

या ट्वीटमधून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा बेबी पेंग्विन असा उल्लेख करत त्यांना इशारा दिला आहे. नुकताच सुशांतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूचा मुद्दा हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चेत आला होता. तर सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणारा रुग्णालयातला कर्मचारी रुपकुमार शाह यांनी समोर येत सुशांतच्या मृत्यूविषयी खुलासा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com