Gulabrao Patil: मी काय दहशतवादी आहे का? सुषमा अंधारे संतापल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Gulabrao Patil: मी काय दहशतवादी आहे का? सुषमा अंधारे संतापल्या

जळगाव : शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील आणि उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. गुलाबराव पाटील यांच्या गृहजिल्ह्यात अंधारे यांना सभा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावरून सुषमा अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.(Gulabrao Patil is very scared by me Sushma Andhare slams)

हेही वाचा: Sushma Andhare: "आमचा गुलाब भावड्या खूपच घाबरलाय"; 'राष्ट्रवादीचं पार्सल'ला अंधारेंच प्रत्युत्तर

सुषमा अंधारे यांच्या सभेला मुक्ताईनगरमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे जळगावमध्ये तणाव निर्माण झाला असून जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. अंधारे यांचा ताफा अडवल्यानंतर अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच सभा घेण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं.

हेही वाचा: राष्ट्रवादीला नेत्यांच्या पळवापळवीची भीती? अजित पवार सावध; कार्यकर्त्यांना म्हणाले...

सुषामा अंधारे म्हणाल्या की, मला काळत नाही की काय होतय. साधारण ५०० पोलिसांनी गराडा घातला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असून तणाव निर्माण झाला आहे. माझा काय गुन्हा आहे हेही कळत नाही. गुलाबराव पाटील सुडाचं राजकारण का करत आहेत, असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

माझा गुन्हा काय असा प्रश्न विचारायचा अधिकार मला आहे. माझा पोलिसांवर राग नसून ते आपलं काम करत आहे. मात्र मी दहशतवादी आहे की, ३०२ ची आरोपी आहे असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :JalgaonShiv Sena