मोदी अन् डिनो मोरियाचा फोटो पोस्ट करत सुषमा अंधारेंचा नितेश राणेंना टोला! नेमकं प्रकरण काय?

डिनोने नरेंद्र मोदींशी संवाद साधतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह त्याने एक पोस्टही लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने ख्रिसमस लंच सर्वात खास असल्याचे सांगितले आहे.
Dino Morea Nitesh Rane controversy
Dino Morea Nitesh Rane controversy

Dino Morea Nitesh Rane controversy

बॉलीवूड सेलिब्रिटी ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. २५ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ख्रिसमस सेलिब्रेशनचेही आयोजन करण्यात आले होते. जिथे ख्रिश्चन समाजातील अनेक लोक पोहोचले होते. या सर्वांसोबतच बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया देखील या सोहळ्याचा एक भाग झाला. या सोहळ्याचे फोटो डिनोने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

डिनोने नरेंद्र मोदींशी संवाद साधतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह त्याने एक पोस्टही लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने ख्रिसमस लंच सर्वात खास असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या फोटोंवरुन आता राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत नितेश राणे यांना चमिटा काढला आहे.

अभिनेता डिनो मोरिया आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटो पोस्ट करत सुषमा अंधारे म्हणाल्या,  "मला हे अज्जीबात म्हणजे अज्जीबात आवडलेलं नाहीय. दर वेळेला आमच्या नितू बाळाला असं तोंडघशी पाडायचं याचा अर्थ काय? याच डिनो मोरियावरून नितू आणि समस्त भाजपच्या बार्किंग ब्रिगेड ने किती उर बडवून घेतला होता."

Dino Morea Nitesh Rane controversy
'पुन्हा अशी चूक करु नका'; 3 नागरिकांच्या मृत्यूनंतर राजनाथ सिहांनी लष्कराला सुनावलं

डिनो मोरिया-नितेश राणे वाद काय होता?

'राज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा डिनो मोरिया आता रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र गुजरातमधील व्यापारी संदेसरा बंधूंनी केलेल्या १४,५०० कोटी रुपयांच्या बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता.

नितेश राणे यांनी डिनो मोरिया यांचे नाव घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. डिनो मोरिया लोकांना सांगत राहतो की तो मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम क्षणार्धात पूर्ण करू शकतो, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता. डिनो मोरियावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर नितेश राणे चांगलेच सक्रिय झाले होते. सखोल चौकशी केल्यास अनेक 'पेंग्विन' बाहेर येतील, असा टोला देखील नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला होता.

Dino Morea Nitesh Rane controversy
Nana Patole on Nana Patekar: "..त्यांना गांभीर्याने घेऊ नका", पटोलेंची 'त्या' वक्तव्यावरुन नाना पाटेकरांवर टीका

नितेश राणेंनी केले होते ट्विट-

बॉलीवूडमध्ये चार-पाच चित्रपट केलेल्या डिनो मोरियाची विशेष ओळख नाही, मग तो मुंबई महापालिकेचे कोणतेही काम क्षणार्धात कसे करून घेतो, दिनो मोरियाचे मित्र कोणाशी आहेत?, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला होता.

संदेसरा घोटाळा प्रकरणात ईडीने डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी यांच्यावर मोठी कारवाई केली होती. ईडीने या दोघांची १.४ कोटी आणि २.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. गुजरातचे उद्योगपती संदेसरा बंधू यांनी सुमारे १४,५०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि डिनो मोरिया यांचे आर्थिक व्यवहारही समोर आले. या कारणास्तव ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली होती.

Dino Morea Nitesh Rane controversy
मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकारने घातली बंदी, UAPA अंतर्गत कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com