Ajit Pawar : राज्यातील अडचणीतील जिल्हा बँकांच्या सक्षमीकरणास कठोर पावले उचला

राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक, बीड, नागपूर, वर्धा आणि बुलडाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कठोर पावले उचलावीत.
Ajit Pawar
Ajit PawarSakal

पुणे - राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक, बीड, नागपूर, वर्धा आणि बुलडाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कठोर पावले उचलावीत, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१५) दिला.

या सर्व जिल्हा बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने अर्थ आणि सहकार या दोन्ही विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी या अडचणीतील जिल्हा बँकांचा नागपूर येथील विधान भवनातील समिती कक्षात आढावा घेतला. या बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, संग्राम थोपटे, सतीश चव्हाण, नितीन पवार, मकरंद पाटील, पंकज भोयर, श्वेता महाले, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बनकर आणि सहकार आयुक्त अनिल कवडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

पवार पुढे म्हणाले. ‘वर्धा व बुलडाणा या दोन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुस्थितीत आणण्यासाठी या बँकांवर चांगले प्रशासक नेमण्यात यावेत. बँकांच्या या स्थितीस कारणीभूत ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांच्यावर कारवाई करावी. तसेच दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासह बँकांच्या थकीत कर्जदारांची मालमत्ता जप्त करावी.

मालमत्तांचे लिलाव करून त्यातून वसुली करण्याच्या दृष्टीने बँकेने कार्यवाही करावी, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासह उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना आखण्यासाठी बँकांना शासन हमी किंवा भागभांडवल देण्याबाबत वित्त व नियोजन विभागाने उपाययोजना सुचवाव्यात. राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात येऊ शकतात. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव अर्थ विभागामार्फत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्यात यावा.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com