तमाशा, लावणीसह दशावतार, भारूड आणि शाहिरीला परवानगी

सरकारने सुधारित आदेश जाहीर करत लावणी, तमाशा, शाहिरी, दशावतार, भारूड आदींना परवानगी देत असल्याचे स्पष्ट केले.
Lavani
LavaniSakal
Summary

सरकारने सुधारित आदेश जाहीर करत लावणी, तमाशा, शाहिरी, दशावतार, भारूड आदींना परवानगी देत असल्याचे स्पष्ट केले.

पुणे - राज्य सरकारने (State Government) कोरोना निर्बंधांमध्ये (Corona Restriction) सूट देताना लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीत सादरीकरणाची परवानगी (Permission) दिली असली तरी यात नेमक्या लोककलांचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी मंगळवारी (ता. ८) सुधारित आदेश जाहीर करत लावणी, तमाशा, शाहिरी, दशावतार, भारूड आदींना परवानगी देत असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

Lavani
"शेर कभी गिधडो के धमकीसे डरा नही करते"

यापूर्वी ३१ जानेवारीला दिलेल्या आदेशात सरकारने भजन, स्थानिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला यांच्या सादरीकरणास बंदिस्त सभागृहात किंवा पेंडॉलमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत सादरीकरणाची परवानगी दिली होती. मात्र यात नेमक्या लोककलांचा उल्लेख नसल्याने त्या कार्यक्रमांना परवानगी मिळण्यास अडचण होत होती. हा संभ्रम दूर करण्याबाबत आमदार अतुल बेनके यांनी सरकारला निवेदन दिले होते. या निवेदनाला उत्तर देतांना सरकारने याबाबत स्पष्टता दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना लावणी, तमाशा, शाहिरी, दशावतार, भारूड आदी कार्यक्रमांना परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लोककलावंतांचा रंगमंचावर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com