Coronavirus: "कोरोना उद्रेकाच्या बातम्या कोणीतरी पेरतंय"; तानाजी सावंतांना नेमकं म्हणायचंय काय?

राज्याची कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर सावंत यांनी विधानसभेत निवेदन केलं.
Tanaji Sawant
Tanaji Sawant

मुंबई : चीन, जपान, अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोक वर काढलं आहे. यापार्श्वभूमीवर जगावर पुन्हा एकदा काळजीचे ढग निर्माण झाले आहेत. ही बाब केंद्र सरकारनेही गांभीर्यानं घेतली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. पण असं असतानाही राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. परदेशात कोरोनाचा उद्रेक झाल्याचा कोणीतरी बातम्या पेरतंय असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं कुठलीही स्पष्टता येत नसल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे. (Tanaji Sawant expressed doubt on news of Corona new wave of World)

Tanaji Sawant
Coronavirus: राज्यात कोविड टास्कफोर्सची होणार पुनर्रचना; आढावा बैठकीत महत्वाचा निर्णय

केंद्रानं दोनच दिवसांपूर्वी याबाबत राज्यांना पत्र लिहून कोरोनाच्या स्थितीची माहिती मागवली होती. यापार्श्वभूमीवर राज्याची कोरोनाची आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला संबोधित केलं. या बैठकीतील चर्चेचं निवेदन नंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेत दिलं.

Tanaji Sawant
Coronavirus: पुणेकरांनो सावधान! दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताये? मास्क जवळ बाळगा

सावंत म्हणाले, "कालपासून मीडिया, सर्वसामान्य जनता आणि सोशल मीडियातून कोरोनाच्या स्थितीबाबत बरंच काही व्हायरलं होतं होतं. त्यामुळं आज आमची मिटिंग झाली यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संबोधित केंल. ही मीटिंग संपल्यानंतर कॅबिनेटपुढे हा विषय चर्चेला गेला. त्यानुसार, मी आत्ता सभागृहाला संबोधित करतो आहे. मागच्यावेळी आपण कोविडची पंचसुत्री पाळली. यामध्ये टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि व्हॅक्सिनेशन याचा समावेश होता. हीच पंचसुत्री परत अंमलात आणावी. तसं बघितलं तर महाराष्ट्रात ९५ टक्के लसीकरण झालं आहे. कोणीतरी या बातम्या पेरत राहतंय की, कोरोना परत आला आहे. चीनमध्ये उद्रेक माजलेला आहे. चार देशात उद्रेक झालेला आहे, त्याचा पेशंट भारतात पोहोचला आहे"

हे ही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

दरम्यान, येत्या सोमवारपासून महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचं दोन टक्के रँडम थर्मल टेस्टिंग आपण करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील महापालिका, मेट्रोसिटी, मेगासिटी इथल्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना आपण जागरुक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा सांगतो की, काळजीपोटी हे निवेदन करतोय घाबरुन जाण्याचं कारण नाही. उद्या केंद्र सरकारनं जे सूचना करतील त्याप्रमाणं आरोग्य खातं पुढील निर्णय घेईल, असंही तानाजी सावंत यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com