फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली? माहिती अधिकारात उघड

फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली? माहिती अधिकारात उघड

45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २३ वर्षीय पुतण्यानं लस घेतल्यानं वाद निर्माण झाला होता. यावरुन राजकारण तापलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं यावरुन देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत टीकास्त्र सोडलं होतं. पण आता, फडणवीस यांचा पुतण्या तन्मय याला लस कशी मिळाली? हे माहिती आधिकारात उघड झालं आहे. बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी, फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली? याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती.

देंवेंद्र फडणवीस यांच पुतण्या तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड झालं आहे. काही दिवसांपूर्वी तन्मय फडणवीसने कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही घेतली होती. लस घेतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरुन मोठा वादंग झाला होता. तन्मयचं ट्विटर अकाऊंट पाहिले तर त्याने अभिनेता असल्याचे नमूद केलं आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना आरोग्य कर्मचारी म्हणून त्याने उल्लेख केला असल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झालं आहे.

फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली? माहिती अधिकारात उघड
राहुल गांधींचे विश्वासू भाजपमध्ये; काँग्रेसला धक्का

समोर आलेल्या माहितीनुसार, तन्मयने पहिली लस मुंबईत तर लस घेतानाचा जो दुसरा फोटो व्हायरल झाला तो नागपुरातला आहे. तन्मय हा पेशानं इंजिनिअर आहे. तसंच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतणा तर माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे. नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे.

फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली? माहिती अधिकारात उघड
न्यूड फोटो FBवर लीक, iPhone ला मोजावे लागतायेत कोट्यवधी रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com