esakal | शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्स करणार आरोग्याविषयी मार्गदर्शन I School
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्स करणार आरोग्याविषयी मार्गदर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू असल्याने त्यासाठी आज शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक पार पडली. यात शिक्षण आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून राज्यात शाळा सुरू करण्याची तयारी केली जात असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. यासाठी राज्यातील यात शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण असून आरोग्याच्या संदर्भात शाळांना अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यासाठी मदत घेण्यासाठी टास्क फोर्सची आणि त्यासोबत पालक संघटना यांची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी नुकतेच मार्गदर्शन सूचना आणि त्याचा जीआर जारी करण्यात आला आहे.मात्र या शाळा सुरुळीत सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी राज्यातील एकूण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक आज मुंबईत पार पडली.

शाळा सुरू करण्यासाठी असलेल्या एकूण परिस्थिती आणि शाळा यांची माहिती या आढावा बैठकीत सादर करण्यात आली. महापालिका क्षेत्रात शिक्षण विभागाकडून स्थानिक प्रशासन आणि टास्क फोर्स यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी शिक्षण विभागाकडून समन्वय साधला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या म्हणाल्या की, शाळा सुरू करण्यासाठी अमही टास्क फोर्सचे, मार्गदर्शन तर स्थानिक स्तरावर आरोग्य विभागाची मदत घेणार आहोत. शिवाय या दरम्यान आपल्या मुलांना शाळांमध्ये पाठवण्यासाठी पालकाना एक विश्वास वाटावा यासाठी आम्ही राज्यातील पालक संघटना, शिक्षक संघटना यासोबत विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते, आणि तज्ञासोबात चर्चा करून शाळा अधिक चांगल्या प्रकारे सुरू कशा होतील यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top