टाटा पॉवरकडून "स्पॉट कलेक्‍शन' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई - टाटा पॉवरने ग्राहक सेवेच्या दृष्टीने मुंबईतील पूर्व विभागात "स्पॉट कलेक्‍शन' सुविधा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकांच्या घरी जाऊन वीजबिल भरणा केला जाईल. मीटर रीडिंग आणि वीजबिलाची प्रतही त्याचवेळी दिली जाईल. 

ग्राहक सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. प्रायोगिक तत्त्वावर काही दिवसांपूर्वी "स्पॉट कलेक्‍शन' सुविधा सुरू करण्यात आली होती. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या सुविधेत "स्पॉट बिलिंग आणि "स्पॉट कलेक्‍शन' सुविधा आहेत. या सुविधेद्वारे वीजबिलांचे घरोघरी वितरण आणि भरणा होत असल्याने ग्राहक समाधानी आहेत. या सुविधेच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचला आहे. अचूक मीटर रीडिंग, कार्यक्षमतेत वाढ, बिलांमध्ये त्वरित सुधारणा, खर्च आणि तक्रारीत कपात असे इतर फायदेही या उपक्रमामुळे झाले आहेत.

Web Title: Tata Power spot collection

टॅग्स