
अविनाश काळे, उमरगा, (जि धाराशिव): तेलंगणा राज्यातील तिघे मित्र शिर्डी येथे साई दर्शन आटोपून, हैद्राबादकडे परत निघाल्यानंतर उमरगा शहराजवळील दाबका गाव शिवारात राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेली कार सुरू करताना अचानक लागलेल्या आगीत कारमालकाचा अक्षरशः जळून मृत्यू झाला. रविवारी (ता.एक) पहाटे पाचच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ हा भयंकर दुर्घटना घडली.