'सरकारला मस्ती म्हणून शिक्षकांचा अपमान' ; सुप्रिया सुळे आक्रमक

एका शिक्षकाचा अपमान शाहू, फुले, आंबेडकरांच्या, महाराजांच्या सरकारकडून होत असेल तर यांना सत्तेची मस्ती आलीय.
supriya sule
supriya sule

मुंबई- एका शिक्षकाचा अपमान शाहू, फुले, आंबेडकरांच्या, महाराजांच्या सरकारकडून होत असेल तर यांना सत्तेची मस्ती आलीय. पक्ष सोडा महाराष्ट्रही शिक्षकाचा अपमान सहन करणार नाही. ती महिला शिक्षक होती, भाजप भ्रष्ट जुमला पार्टी सातत्यानं अपमान करत असते. याची मित्रपक्षांनाही सवय लागलीय, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बीडमध्ये एका महिला शिक्षिकेला झापलं होतं. यावरुन सुळे यांनी केसरकर आणि सरकारला सुनावलं आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या भागात सरसकट कर्जमाफी करावी. अवकाळीनं प्रचंड नुकसान केलंय. संसद सुरू होणार आहे. त्यावेळी मी पूर्ण ताकदीनं प्रश्न मांडेन, असंही त्या म्हणाले. (teacher recruitment women ask question to education minister deepak kesarkar supriya sule comment)

supriya sule
Education News: नव्या भरतीतील शिक्षकांना 'जिल्हा बदली'बंद ; दीपक केसरकर यांची माहिती

अवकाळीमुळे प्रचंड नुकसान

महाराष्ट्र राज्य अडचणीच्या वळणावर उभाय.राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अवकाळी पाऊसामुळे प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांसमोरचं संकट उभं असून सर्वांनी कामाला लागलं पाहिजे. २६०० कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केलीय. तातडीनं दिल्लीहून टीम बोलवा, ३ दिवसात तलाठी कलेक्टर यांनी कामं करावं, असं सुळे म्हणाल्या.

फडणवीसांवर टीका

राज्यात अनेकठिकाणी दगडफेक होताना दिसतेय, भाजपच्या खासदारांवर ही दगडफेक झाली. इंटेलिजन्स करतोय काय? वैयक्तिक माझं देवेंद्रजींशी भांडण नाही, हे भांडण वैचारिक आहे.ते पहिल्यांदा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे गृहखातं होतं, क्राईम कॅपिटल तेव्हा नागपूर ओळखलं जायचं. ते मंत्री असताना क्राईम वाढतो कसा? हे मी नाही डेटा बोलतो, असं म्हणत त्यांनी टीका केली.

supriya sule
Deepak Kesarkar : मंत्री केसरकर खरंच आमदारकी सोडून खासदारकी लढवणार? स्वत:च केला 'या' मतदारसंघावर दावा!

संदीप क्षीरसागर कुटुंबाच्या वेदना पाहा. जालन्यातील घटनेमध्ये अमानुष पद्धतीनं महिलांना, मुलांना मारलं. त्यावा कोण जबाबदार? गृहमंत्रालय काय करतंय? महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांचे फोटो मी पाहिलेत… काही कॉमन लोकांसोबत फोटो असतात. सगळ्याच पक्षांतील लोकांसोबत असतात, असं सुळे म्हणाल्या. पोलिसांवरील दगडफेक प्रकरणातील आरोपी बदरे याविषयी त्या बोलत होत्या.

दिल्लीतील अदृष्य शक्ती

महाराष्ट्र आत्ता दिल्लीतूनच चालतोय त्यामुळे त्यात काही नवल नाही. पालकमंत्री असो, बदल्या असोत मंत्रीपदे असो सगळे निर्णय आता दिल्लीतूनच होऊ लागले आहेत. याला जबाबदार दिल्लीतील अदृष्य शक्ती आहे. महाराष्ट्राच महत्व कमी करण्याचं काम दिल्लीची अदृष्य शक्ती करतेय. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं मग ते गडकरी असोत फडणवीस असोत त्यांच देखील त्यांनी तेच केल आहे, असं त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com