शिक्षक होण्याचे अजुनही स्वप्नचं; शिक्षक भरती पुन्हा कधी सुरू होणार?

मीनाक्षी गुरव
Saturday, 5 September 2020

राज्यात जवळपास १०-१२ वर्षांपासून शिक्षक भरती होत करण्यात आली नव्हती. त्यानंतर २०१७ मध्ये राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली. पवित्र पोर्टलमार्फत जवळपास १२ हजारहुन अधिक जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली.

पुणे :"लहानपणी शिक्षकांनी अभ्यासाबरोबरच जीवन जगण्याचे धडे गिरवून घेतले. जीवनाला आकार देण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. आपणही शिक्षक होऊन इतरांना ज्ञानदान करावे, असे स्वप्न होते. म्हणून २०१० मध्ये डी. एड. पूर्ण केले आणि तेव्हापासून आतापर्यंत शिक्षक होण्याची प्रतीक्षा करत आहे. आता हाताला रोजगार नसल्याने शेतीकडे वळलो", अशा शब्दात हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) गावातील जीवन काकडे यांनी भावना व्यक्त केल्या.

राज्यात जवळपास १०-१२ वर्षांपासून शिक्षक भरती होत करण्यात आली नव्हती. त्यानंतर २०१७ मध्ये राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली. पवित्र पोर्टलमार्फत जवळपास १२ हजारहुन अधिक जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यात पहिल्या यादीत सुमारे पाच हजारांहुन अधिक उमेदवारांच्या भरतीची यादी जाहीर करण्यात आली. मात्र त्यानंतर मे २०२०मध्ये राज्य सरकारने पद भरतीला स्थगिती दिली. परिणामी शिक्षक भरतीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांच्या पदरी निराशा पडली. अद्यापही राज्यातील हजारो उमेदवार भरतीच्या प्रतिक्षेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंगोलीतील काकडे प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आहेत. शिक्षक भरती थांबल्यामुळे उदर निर्वाहाचा प्रश्न उद्भवल्याने काकडे हे सध्या आपल्या आई-वडिलांसमवेत शेती करत आहेत. काकडे यांच्याप्रमानेच या भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांची स्थिती आहे.

सध्या पुण्यातील महापालिकेच्या शाळेत कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून काम करणारे शांतीलाल सूर्यवंशी देखील भरतीच्या प्रतिक्षेत गेल्या काही वर्षांपासून आहेत. मुळचे नगरमधील असणारे सूर्यवंशी हे देखील हाताला काम नसल्यामुळे शेतीकडे वळाले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

आधीच संथ गतीने सुरू असलेल्या शिक्षक भरतीला कोरोनाच्या सावटामुळे खिळ बसली आहे. परिणामी शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे हे उमेदवार भरती प्रक्रियेला हिरवा कंदील कधी मिळणार याच्या प्रतिक्षेत आहेत. 

शिक्षक भरतीवरील स्थगिती उठविण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे
"शिक्षक भरतीला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात यावी, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्थगिती उठविण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या अर्थ खात्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला अर्थ खात्याची मान्यता मिळाल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल आणि भरतीतील दूसरी यादी जाहीर केली जाईल.",
- विशाल सोळंकी, राज्य शिक्षण आयुक्त

बेकायदा धंदे कधी बंद होणार ? आळंदीकरांचा प्रशासनाला सवाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers are Still waiting for When will teacher recruitment resume