शिक्षक आज शोधणार शाळेत न जाणारी मुले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - एका दिवसात मुंबईतील रस्ते, सिग्नल, ब्रिज, बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवर छोटेखानी धंदा-व्यवसाय करणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या मुलांना पकडून जवळच्या शाळेत दाखल करण्याची कसरत शिक्षकांना बुधवारी (ता. 21) करावी लागणार आहे. एका दिवसात परिसरातील शाळेत न जाणारी मुले सापडतील का, नेमकी संख्या समजणार तरी कशी, असा प्रश्‍न शिक्षक विचारत आहेत.

शाळेच्या वेळेतच या शाळाबाह्य मुलांना शोधून आणा, असे फर्मान असले तरी पाच-सहा तासांत यात किती यश येईल, याबाबत शिक्षक साशंक आहेत. शाळेत नाव नोंदवून पळ काढणाऱ्या मुलांची संख्या फारच मोठी आहे. या मुलांना शाळेकडे वळवण्यासाठी सरकारी योजना सक्षम नाहीत, अशी खंत एका शिक्षकाने व्यक्त केली.

सोमवारी मध्यरात्री शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून बुधवारी अशी मुले शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्याच दिवशी त्यांची नावे शाळेत नोंदवावी लागणार आहेत. पालिका तसेच खासगी प्राथमिक शाळांतील प्रत्येकी दोन शिक्षक संबंधित विभागातून फिरतील. सकाळी पालिकेच्या वॉर्ड कार्यालयात नावनोंदणी केल्यानंतर दिलेल्या फॉर्मवर शाळाबाह्य मुलांची नोंदणी करून त्यांना शाळेत घेऊन यावे लागले. मंगळवारी उत्तर पालिका विभागात सर्व शिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन मुख्याध्यापकांना याविषयीच्या सूचना दिल्या. या सर्वेक्षणातून खासगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना वगळण्यात आले आहे.

मुलांना दिलेली आर्थिक मदत अपुरी
केंद्र सरकारकडून शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या बॅंक खात्यात वर्षअखेर तीन हजार रुपये जमा केले जातात. हे तीन हजार रुपये आणि एका वेळच्या पोषण आहारातून मुलाला शाळेत घालण्यासाठी पालकांना प्रोत्साहन मिळत नाही. शाळेत न जाता कामधंदा करणारे मूल महिन्याला तीन हजारांहून अधिक कमावते. त्यामुळे केंद्र, राज्य सरकार व पालिकेनेही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी केली.

Web Title: Teachers to children out of school to look for today