जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिक्षक संघटनांचे म्हणणे वाचा

अशोक मुरुमकर
रविवार, 31 मे 2020

जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे, आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करा. जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने, पण शिक्षण सुरू झाले पाहिजे, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, यावर समिंश्र प्रतिक्रीया उमठू लागल्या आहेत. काही शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे. तर काही शिक्षक संघटानांनी योग्य नियोजन न करता शाळा सुरु करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सध्या परस्थितीत सरकारने कोणतेही शिक्षणाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने संभ्रमावस्था असल्याचे म्हणणे आहे.

सोलापूर : जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे, आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करा. जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने, पण शिक्षण सुरू झाले पाहिजे, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, यावर समिंश्र प्रतिक्रीया उमठू लागल्या आहेत. काही शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे. तर काही शिक्षक संघटानांनी योग्य नियोजन न करता शाळा सुरु करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सध्या परस्थितीत सरकारने कोणतेही शिक्षणाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने संभ्रमावस्था असल्याचे म्हणणे आहे.  
मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्‌वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही, हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे. गुगल क्लासरुमचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र,  स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

हेही वाचा : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!
शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव शिरसाट म्हणाले, जुनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. याच स्वागतच आहे तसेही शिक्षक मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजतागायत ऑनलाईन शिक्षण देतच आहेत. केवळ शाळा कधी सुरू होणार यापेक्षा सरकारने शाळा सुरू झाल्यावर ऑनलाईन शिक्षण देण्याचे महाराष्ट्रात एकसुत्री धोरण काय असेल हे प्रथम नियोजबद्ध रित्या जाहिर केले पाहिजे. सद्य परिस्थितीत सरकारचे कोणतेही शिक्षणाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षक सभ्रमावस्थेत आहेत. चॅनेल द्वारे शिक्षण देणे हेच सर्व सामान्य विद्यार्थ्याच्या दृष्टीने योग्य राहील.
महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब गोतारणे म्हणाले, कोरोनामुळे जागतिक स्तरावर शैक्षणिक प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शहरी, ग्रामीण, आदिवासी भागातील प्रश्न हे शालेय व्यवस्थापनात भिन्न आहेत. तसेच विद्यार्थी व पालक, प्रशासन, स्थानिक प्रशासन, आरोग्य, शालेय शिक्षण व क्रीडा यांच्या सहकार्याने राज्यातील शिक्षण विभागाच्या सर्व अडचणी परिस्थिती निहाय सोडवल्या जातील. ई ल्रनिगचा बाऊ न करता सहज शक्य शिक्षण द्यायला शिक्षक, पालक यांनी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यासक्रम निश्चित करून सत्र नियोजन करण्यात आली पाहिजेत. राज्यात सरकारने शाळा भरविण्याचा हट्टहास करू नये. सुलभरीत्या शिक्षण देण्याची गरज आहे. मोबाईलच्या जजाळात विद्यार्थीना अडकून राहील, असे काही वातावरण व प्रश्न निर्माण होता कामा नये. राज्य सरकारने बालचित्रवाणी वाहिनी परत सुरू करावी.

 

हेही वाचा : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक नितीन चौधरी म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मे महिना संपत आला. दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या शैक्षणिक वर्षांत 2020- 2021 शाळा कधी सुरू होणार याची चिंता सर्व घटकांना आहे. 15 जूनपासून शाळा सुरू करण्यासंबंधी बातम्या येत आहेत. शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक व संस्था चालकांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा कशा भरवायच्या हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना 28 मे रोजी पत्र लिहून याविषयी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले व सूचना केल्या होत्या. त्यात १५ जूनपासून शाळा सुरु झाल्या तर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाहीत. पालकांच्या मनात कोरोनाची भिती आहे. शाळा भरताना आण सुटताना गर्दी होते. एक बेंचवर तीन विद्यार्थी बसवणाऱ्या शाळा, ६० हून अधिक विद्यार्थी असणाऱ्या ४०० चौ. फूट आकाराच्या खोलीत खच्चून बसणाऱ्या शाळा यामध्ये होणारी झोंबाझोबीचा अनुभव पाहता शाळेतील हजेरी कोरोनाला स्वत: हून निमंत्रीत केल्या समान वाटेल, असं या पत्रात म्हटलं आहे. याबरोबर साऊथ कोरीया आणि जर्मनी यांच्यावर पुन्हा शाळा बंद करण्याची नामुष्की पत्कारण्याची वेळ आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers unions oppose start of academic year in Maharashtra in June